Ad will apear here
Next
...आणि वृत्तपत्रे भारतात आली!
बरोबर २४१ वर्षांपूर्वी १७८० साली आजच्या दिवशी (२९ जानेवारी) जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश गृहस्थाने ‘बंगाल गॅझेट’ या साप्ताहिक वृत्तपत्राची कलकत्त्यात निर्मिती केली व भारतात पत्रसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

हिकी भारतात आला, तेव्हा पहिले गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांची राजवट होती. हिकीने लॉर्ड हेस्टिंग्जच्या पत्नीवरही टीकेची झोड उठवली. त्यामुळे त्याने तुरुंगवासही भोगला.

तुरुंगातूनही हिकीने टीकासत्र चालूच ठेवले. तेव्हा हेस्टिंग्जच्या आदेशाने बंगाल गॅझेटच्या प्रेसमधून टाइपच जप्त करण्यात आले. भारतीय पत्रकारांच्या लढ्याचा इतिहास पहिल्या वृत्तपत्रापासूनच सुरू झाला.

बंगाल गॅझेट अल्पायुषी ठरले व दोनच वर्षांत बंदही पडले; पण त्यामुळे एका उज्ज्वल परंपरेला सुरुवात झाली. त्यामुळेच हिकीचे बंगाल गॅझेट अमर झाले!

- भारतकुमार राऊत




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NUVFCU
Similar Posts
गुरूचा वाढदिवस! ज्याच्या पत्रिकेतील गुरू बलवान, तो आयुष्यात यशस्वी ठरतो व दुसऱ्यांवर प्रभुत्व गाजवतो, अशी समजूत आहे. अशा सर्वशक्तिमान गुरूला प्रणाम! ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी गुरू या सूर्यमालिकेतील सर्वांत मोठ्या ग्रहाचा शोध लावला तो आजच्याच दिवशी (सात जानेवारी) १६१० या वर्षी.
... आणि निनादली ‘तुतारी’! स्फूर्तीचे कवी कै. कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत यांनी लिहिलेली ‘तुतारी’ ही स्फूर्तिदायी कविता प्रथम प्रसिद्ध झाली, त्या घटनेला आज (२७ मार्च) १२८ वर्षे झाली.
१८५७च्या स्वातंत्र्यसमराची पहिली गोळी! ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतीयांनी उभारलेल्या १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाची पहिली गोळी १६० वर्षांपूर्वी २९ मार्च रोजी कोलकात्याजवळील बराकपूर या लष्करी छावणीत झाडली गेली व काही दिवसांत सर्वत्र भडका उडाला.
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language